Solapur| जिल्हा परिषदेसमोर गाढविणीशी अनोखं लग्न, सोडून गेलेली पत्नी परत मिळावी यासाठी आंदोलन

सोलापुरात सोडून गेलेली पत्नी परत मिळावी यासाठी दीपक सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने जिल्हा परिषद गेटसमोर थेट गाढविणीशी लग्न करत अनोखे आंदोलन केले. मागील १६ वर्षांचा संसार तुटल्याने तसेच नातेवाइकांनी पत्नीला दूर केल्याचा आरोप करत ते गेल्या १५ दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले होते. प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने त्यांनी हे वैफल्यग्रस्त होऊन प्रतिकात्मक लग्न करून निषेध नोंदवला.

संबंधित व्हिडीओ