सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पावसासाठी एक अनोखा उपाय करण्यात आला आहे... सप्टेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने मोडनिंब गावातील ग्रामस्थांनी चक्क गाढवाचं लग्न लावलं... पूर्वीच्या काळापासून गाढवाचं लग्न लावल्यास पाऊस पडतो अशी आख्यायिका असल्याने ग्रामपंचायतीसमोर दोन गाढवांचा विवाह सोहळा पार पडला... अंतरपाट, मंगलाष्टक आणि अक्षतांच्या साक्षीने झालेल्या या अनोख्या लग्नसोहळ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून आता या लग्नानंतर तरी पाऊस पडावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Solapur News | A unique measure for rain in Madha: A donkey wedding actually held in Modnimb.