राज्यातल्या 75 टक्के भूभाग सध्या दुष्काळात होरपळतोय..शेतातलं पीक करपून गेलंय, हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही..वर्ष कसं जाणार ही चिंता आहेच, पण आला दिवस कसा ढकलावा या विवंचनेत शेतकरी आणि कष्टकरी वर्ग आहे...हे कमी होतं की काय तर ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंट्सचा धुडगूस सुरू झालाय. त्यामुळे अगोदरच दुष्काळाने पिचलेला शेतकरी कर्जाच्या विळख्याने अधिकच बेजार झालाय, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट