Special Report| राज्यात दुष्काळी परिस्थिती, दुष्काळाबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं असलं तरी राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडलाय. या भागात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घेण्याची विनंती केलीय. तसंच प्रभावित भागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय. पाहूयात एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ