Kalachowki cha Mahaganpati Mumbai | काळाचौकीचा महागणपतीजवळ भाविकांना लागला शॉक, पाचजण जखमी
Devotees suffer electric shock near Kalachowki's Mahaganpati; five injured.
मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 5 जणांना शॉक लागल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा जवळपास 2 च्या सुमारास ही घटना झाल्याची अग्निशमन दलाची माहिती आहे. यामध्ये एकूण 5 जणांना मसीना रुग्णालयात आणला गेले होते. त्यात 2 मुलं आणि 3 मुली असून सर्व जण 8 ते 20 वयोगटातील आहेत. रुग्णांपैकी एका मुलीला उपचारासाठी परेल येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक मुलगी जवळपास 8 वर्षांची असून तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.