Pune Baner | गॅसवाहिनीच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली, पुण्याच्या बाणेरमधील घटना | NDTV Marathi
Water pipeline bursts during gas pipeline work; incident in Pune's Baner area.
बाणेरमधील बिटवाइज टॉवरजवळ भूमिगत गॅसवाहिनीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना. एमएनजीएलच्या यंत्राचा धक्का लागल्याने महापालिकेची ४५० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले. चांदणी चौक ते मोहननगर उंचावरील जलकुंभादरम्यानची जलवाहिनी बाधित.
जलवाहिनीत सुमारे ७ बार दाब असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने पाणी उपसा बंद. बालेवाडी, बाणेर आणि पाषाणचा पाणीपुरवठा दोन तासांत सुरळीत. मोहननगर परिसरातील पाणीपुरवठा तब्बल १४ तासांनंतर सायंकाळी आठ वाजता पूर्ववत.