राज्यावरील इंधन संकट आता अधिक तीव्र बनत चाललंय. राज्यातील अनेक शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आलेत. आणि जिथे पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागतायत... पेट्रोल डिझेलअभावी शेतात ट्रॅक्टरनं होणारी मशागतीचं कामं खोळंबली आहेत. इतकंच काय... डिझेल नसल्यानं पोलिसांना गुन्हेगारांचा तपास करणंही अवघड होऊन बसलंय... इंधन तुटवड्यानं नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात, जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट.