शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी.शिवरायांच्या गडकिल्ल्याचा प्रवास घडवणारी, मराठा पर्यटन गाडी ९ जूनपासून सुरू होत आहे. करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन या योजनेत पाहायला मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना त्यांच्या आयुष्याशी निगडित ठिकाणं, किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. या अनोख्या प्रवासात पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज मिळणार आहे.