नागपूरच्या महाल परिसरात बडकस चौकात एसआरपीएफ पथक दाखल झालं आहे. याच भागात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक सं घाच्या मुख्यालय परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेशिमबाग येथे स्मृती मंदिर परिसरात देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात आली आहे.