गुढीपाडव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्याला हात घातला. बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापराला प्राधान्य दिलं जातं की नाही हे तपासण्याची जबाबदारी राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपवली. ज्यानंतर अनेक भागांत मनसेसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन मराठी न बोलणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना कानफटावलं. अखेरीस सरकारने या बाबतीत दखल घेतल्यानंतर राज ठाकरेंनी हे आंदोलन तूर्तास थांबवण्याचे आदेश दिले आहेत.