सुप्रीम कोर्टानं सर्वच सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं एक मोठा निर्देश जारी केलाय. केवळ कर्करोगविरोधी औषधांपुरतीच किंमत नियंत्रणाचे उपाय मर्यादित ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण औषध बाजारपेठेचे नियमन का केले जाऊ शकत नाही असाही प्रश्न सरकारला विचारला. त्यामुळे लवकरच सर्वच औषधांच्या किंमतींबाबत दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सवालानंतर सरकार काय पावलं उचलणार पाहूया एक रिपोर्ट....
Supreme Court on Medicine prices l सगळीच औषधं स्वस्त होणार? सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?