Raigad Boat| रायगडच्या कोरलई समुद्रात संशयास्पद बोट, बोट पाकिस्तानी असल्याचा संशय | NDTV मराठी

रायगडच्या कोर्लई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे... या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे... रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली... रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या... संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली... कोर्लईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे...

संबंधित व्हिडीओ