राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर 'मोक्का' लावण्याच्या हालचाली धाराशिव पोलिसांकडून सुरू आहेत.पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.या प्रकरणात ३७ आरोपी असून, अजूनही १५ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी कारवाईची सर्व तयारी पूर्ण केली असून, मोक्कासाठीची फाईल वरिष्ठांकडे पाठवली गेली आहे. पोलिसांच्या तपासात या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन केवळ तुळजापूरपुरतंच नाही, तर धाराशिव, सोलापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलीस तपासावर वारंवार संशय घेतला जात होता. त्यामुळेच आता पोलिसांनी 'मोका' अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्यात.