मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. तीन रुपयांची भाडेवाढ करण्यात यावी असा प्रस्ताव राज्य वाहतूक विभागाने मांडलाय. अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण अंतिम भाडे सुधारणा ठरवेल. याआधी रिक्षा आणि टॅक्सी चे भाडे ऑक्टोबर 2022 मध्ये वाढले होते त्यानंतर एकही रुपयाची वाढ झाली नव्हती त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ करा अशी मागणी टॅक्सी चालक आणि वाहकांकडून केली जात होती . मात्र प्रवासी ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढ संदर्भात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.