Pahalgam Terror Attack| पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, आतापर्यंतचे लेटेस्ट अपडेट NDTV वर

नंदनवन काश्मीरला पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्याचा डाग लागलाय.काश्मीरच्या पहलगाममध्ये काल दुपारी अडीचच्या दरम्यान दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केलं.या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर काही पर्यटक जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममधील मिनि स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळावर फक्त घोड्यावरुन किंवा पायी जाता येतं, तिथे पर्यटक घोड्यावरुन आणि पायी जात असताना पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. सात ते आठ हल्लेखोर असल्याचं समजतंय. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारला आणि जे मुस्लीम नाहीत, त्यांच्यावर गोळीबार केला.

संबंधित व्हिडीओ