पालघर आणि ठाणे जिल्ह्यात आज पासून तीन दिवस पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे...रविवार, सोमवार आणि मंगळवार या तीन दिवसांत जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे... तुरळक ठिकाणी पावसासोबत तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे आणि विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.... या अवकाळी पावसाचा फटका दोन्ही जिल्ह्यातील वीट उत्पादक आणि फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे...पावसाचा उन्हाळी भात पिकावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत... उन्हाळी हंगामातील आंबा, जांभूळ आणि भाजीपाला पिकांवर पावसाचा परिणाम होऊ शकतो... त्यामुळे पाऊस सुरु असताना अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे, विजेच्या तारांपासून दूर राहावे आणि शेतकऱ्यांनी कापणीला आलेली पिके संरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.