PM Modi यांच्यावर 19 एप्रिलला दौऱ्यावेळी होता हल्ल्याचा प्लॅन? NDTV मराठीच्या हाती मोठी बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वेचे उद्घाटन करणार होते.परंतु त्या दिवशी कटरा येथे वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने मोदी यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला.या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी अशा हल्ल्याचा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला होता. कटरा ते श्रीनगर रेल्वेमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्याचा भाग देशाच्या अन्य राज्यांशी अधिक उत्तमप्रकारे जोडला जाणार आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यताही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ