नालासोपाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.अक्षयदीप विसावाडिया असं आरोपीचं नाव असून त्याला संतप्त शिवभक्तांनी चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं. आरोपी अक्षयदीपची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.विजय नगरच्या हिल व्ह्यू सोसायटीच्या व्हॉट्सॅप ग्रुपवर आरोपीने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं.याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवभक्तांकडून अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.