सिंधू नदीवर कोणतीही रचना बांधली, तर पाकिस्तान हल्ला करेल” असा इशारा पाक संरक्षण मंत्र्यांनी दिलाय. “सिंधू जल कराराचे उल्लंघन करत कोणतीही रचना सिंधू नदीवर बांधण्याचा प्रयत्न झाल्यास, पाकिस्तान ती रचना उद्ध्वस्त करेल,असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय.