देशातील पहिल्या आधार धारक असलेल्य रंजना सोनवणे यांना तब्बल नऊ महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय.रंजना यांनी योजनेसाठी नारी शक्ती दूत ऍपमधून नोंदणी केली होती.मात्र योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न होता त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या अंधेरीतील खात्यात जमा झाली होती.जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी याचा पाठपुरावा केला. त्यानंतर ही रक्कम 9 महिन्यांनी रंजना सोनवणे यांच्या खात्यात जमा झाली.रंजना सोनवणे या शहादा तालुक्यातील टेंभली गावच्या रहिवासी असून.. त्या मोलमजुरी करून आपलं पोट भरतात.