शरद पवार गटाला बाजूला ठेवून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू.उद्धव ठाकरे यांची थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा सुरू.राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक.मतांचा कोटा ३६ एवढा आहे.महाविकास आघाडीकडे ५० मतदार…त्यामुळे ७ पैकी एक जागा महाविकास आघाडीची निश्चित.दोन पक्षात राज्यसभा आणि विधान परिषद जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती.कारण पुढील महिन्यात परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार असून निवडणूक लागणार आहे.परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत २९ मतांचा कोटा आहे.त्यामुळे ९ पैकी एक जागा ही महाविकास आघाडीला मिळणार आहे हे निश्चित आहे.