शिंदे गटाकडून ठाकरे गटात ऑपरेशन टायगर राबवण्याची चर्चा जोरदार सुरू असतानाच ठाकरेंचे दोन खासदार यांनी शिंदे पिता पुत्रांची भेट घेतलीय.नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमात ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थिती लावली.महापौर, उपमहापौरांच्या सत्कार सोहळ्याला राजाभाऊंनी हजेरी लावली.तर दुसरीकडे मुंबईत एकनाथ शिंदेंच्या भेटीला हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर पाटील हे थेट मुंबईत पोहोचले, मुंबईतील शिंदेंच्या निवासस्थानी नागेश आष्टीकर पाटील यांनी भेट घेतली.