मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधून आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश करण्याची जरांगे यांची प्रमुख मागणी आहे.