Mumbai ते Nagpur.. धमक्यांचा सूर; राज्यभरात विविध ठिकाणी धमक्यांचे मेल, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

राज्यातील न्यायालयांना आणि सरकारी कार्यालयांना धमकीच्या ई-मेलचं सत्र सुरूच आहे. मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल आला आहे. मुंबई महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई पालिकेत दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी बॉम्ब हल्ला होईल, असा दावा मेलमध्ये करण्यात आला आहे. तिकडे नवी मुंबई महापालिका, बेलापूर न्यायालय, सिडको आणि कोकण भवन यांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ