Threatening Email | राज्यभरात अनेक ठिकाणी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, कुठे आणि कुणाला आली धमकी ?

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल आला आहे. यानंतर कोर्टातील सीसीटीव्ही कॅमरेदेखील बंद होते. कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. - पुणे पाठोपाठ नाशिक न्यायालयालाही पुन्हा धमकीचा मेल. सहावा मजला उडवून देण्याचा मेलमध्ये उल्लेख. नाशिक न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बंदोबस्त तैनात. न्यायालय आवारात बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी सुरू आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरली तपासणी नाका बॉम्बने उडवण्याची धमकी. 26/11 हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धमकीचा फोन. शिरपूर पोलिसांकडून धमकीच्या फोनचा तपास सुरू. धमकीनंतर तपासणी नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

संबंधित व्हिडीओ