मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजपासून तीन दिवसांचा ब्लॉक सुरु झालाय.... दुपारी बारा ते तीन या दरम्यान हा ब्लॉक असेल. पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसे ने हा निर्णय घेतलाय... कुसगांव हद्दीतील पुलाचे गर्डर्स बसविण्याचं काम युद्धपातळीवर केलं जाणार आहेत.... पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत कोणताही बदल नसेल, तिन्ही दिवस मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगतीवरून सुरु राहील. या ब्लॉक संदर्भात मुंबई पुणे महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, सूरज कसबे यांनी.