तुळजाभवानी मंदिर VIP दर्शन प्रकरणात कारवाई; मटका किंगला गाभाऱ्यात प्रवेश दिल्यानं अमोल भोसले निलंबित

तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी दर्शन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांना निलंबित करण्यात आलं आहे.. सोलापूरातला कथित मटका किंग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीनं थेट देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून फोटोसेशन केलं.. एकीकडे शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी सामान्य भाविक ताटकळत उभे आहेत.. तर दुसरीकडे मटका किंग सोलापूरच्या अरुण रोडगेसाठी मात्र पायघड्या घालण्यात आल्या.. या प्रकारावर तुळजापूरच्या भोपे पुजारी मंडळाने आक्षेप घेतला होता. नवरात्रीत सर्वसामान्य भाविक रांगेत असताना विशेष व्यक्तीला गाभाऱ्यात प्रवेश कसा दिला, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या वादानंतर मंदिर संस्थानने कारवाई करत धार्मिक व्यवस्थापकांना निलंबित केलंय..

संबंधित व्हिडीओ