Bhausaheb Wakchaure यांच्या पक्षप्रवेशानंतर Thackeray गट आक्रमक; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलंय.आज वाकचौरे शिर्डीत येण्याची शक्यता असताना, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर पोलिसांकडून नजर ठेवत जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. दुसरीकडे, 29 जून रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या तयारीची नियोजन बैठक सुरु असताना शासकीय विश्रामगृह बाहेर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्यान आम्हाला नजरकैदे केल जात असल्याचा आरोप ठाकरे सैनिकांकडून करण्यात आलाय.. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.

संबंधित व्हिडीओ