रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार पुनरागमन झालंय. रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे.दरम्यान हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी २६ जूनपर्यंत पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसाने गेले 15 दिवस दडी मारली होती, मात्र दमदार पावसाने जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नवसंजीवनी दिली असून, बळीराजा सुखावला आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे रखडलेली शेतीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत.