बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्यासाठी ठाकरे गटाचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांना जबाबदार धरलं होतं. या माणसाने शिवीगाळ केली, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असं संजय दिना पाटील यांनी म्हटलं होतं. दरम्यान या आरोपांनंतर आता ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर मैदानात उतरलेत. संजय दिना पाटलांचे आरोप खोटे असल्याचा त्यांनी दावा केला.. तसंच तुम्ही पळालेले लांडगे आहात त्यामुळे शिनसैनिक तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही कोरगावकर यांनी दिलाय.. दरम्यान संजय राऊतांनी संजय दिना पाटलांवर शिवीगाळ केलीय. यानंतर आता रमेश कोरगावकरांनीही संजय दिना पाटलांबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केलाय.