उल्हासनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झालेत... शिवसैनिकांनी यावेळी महापालिकेत भाजप विरोधात घोषणाबाजी करत प्रचंड गोंधळ घातला. शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती आणि शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या विरोधात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झालेत. उल्हासनगर महापालिकेत यामुळे प्रचंड तणाव निर्माण झालाय. यावेळी भाजपा सभापतीच्या दालनासमोर शिवीगाळ करत शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी निकम यांना काळे फासणार असा इशारा दिल्यानंतर कमलेश निकम उल्हासनगर महापालिकेत दाखल झाले यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून माझी हत्या केली जाईल असा आरोप निकम यांनी केला आहे.