हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह हिमायतनगर तालुक्यातील काही भागात तुरळक गारपीट झालीय. या अवकाळी पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील आंबा, ज्वारी आणि काढून ठेवलेल्या हळदीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे..