तुम्ही शाकाहारी की मांसाहारी. तुम्ही मद्यपान करता का असे प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले. एखाद्या तरुणाच्या लग्नाआधी त्याची चौकशी केली असेल असं तुम्हाला वाटलं असेल. तर हे मुलाखतीचे प्रश्न चक्क अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या सीईओ पदासाठी उमेदवारांना विचारण्यात आले. श्रीराम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी मुलाखत देणाऱ्यांना समितीने हे प्रश्न विचारले होते. सोमवारपासून मुलाखतींना सुरुवात झाली आहे. या पदासाठी देशभरातून 5 हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 5 फेऱ्यांमधला ऑनलाईन संवाद आणि छाननीनंतर 18 उमेदवारांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. सीईओ पदासाठी निवडला जाणारा उमेदवार हा सनातन धर्माचा कट्टर पाठीराखा आणि पूर्णपणे व्यसनमुक्त असावा, अशी ट्रस्टची भूमिका आहे.