अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यातील पर्जन्यमानात घट झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत धरणांमधील १० टक्के पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर १६ ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी वापरात १० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत पाणी उपशावरही कठोर कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे.