दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची झळ तशी कमी आहे. मात्र दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांपैकी यंदा राजापूर, कोळम बुद्रुक, अंकाई यासह दहा ते बारा गावातील ग्रामपंचायतींनी येवला पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव दाखल केले आहेत... त्या गावांना तहसीलदासह भेट देऊन पाहणी करून त्यानंतर टँकर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून र्मंजुरी घेत आठ ते दहा दिवसातच संबंधित गावांना पिण्याचे टँकर सुरू करण्यात येईल अशी माहिती येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली.