पुण्याच्या भोरमधील नसरापूर गावात घडला संतापजनक घटना घडलीय.. एका 2 वर्षीय चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय... घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार घडला.. इतकंच नाही तर नराधमाने तीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला.दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली.. त्यानंतर परिसरातले cctv फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती.संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.. जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत मृतदेह घेऊन जाऊ देणारं नाही.. अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे..