काश्मीर मधल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड कोण ते आता समोर आलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षा दलानं अतिरेक्यांचा फोटो सुद्धा जारी केलाय तीन दहशतवाद्यांची स्केच ही जाहीर करण्यात आलेली आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हा हाफिज सईदचा मित्र आहे. भारत विरोधात हा कट कसा आखण्यात आला या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात.