काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इतर राज्यातील लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. मात्र याचा सगळ्यात मोठा आर्थिक फटका हा स्थानिक लोकांना बसणार आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटक इतके घाबरलेत की त्यांनी पुढील चार ते पाच महिन्यांसाठीचं त्यांचं बुकिंग हे कायमचं रद्दच करून टाकलंय.