जाहिरात
This Article is From Jul 17, 2024

Rain Update : कोकणानंतर विदर्भात मुसळधार पावसाचा अलर्ट; मुंबईत कसं असेल चित्र? 

नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rain Update : कोकणानंतर विदर्भात मुसळधार पावसाचा अलर्ट; मुंबईत कसं असेल चित्र? 
मुंबई:

आज बुधवार 17 जुलै रोजी विदर्भात अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात (Vidarbha Rain Update) अन्यत्र ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांचा येलो अलर्ट आहे. नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आज विदर्भातील कमाल तापमान 27 ते 32 डिग्री यादरम्यान राहणार असल्याचं अपेक्षित आहे. किमान तापमान 22 ते 26 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात (Maharashtra Rain Update) बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - जातानाही सूटका नाही! विदर्भातील 'या' गावात कंबरेभर पाण्यातून निघते अंत्ययात्रा

विदर्भात अन्यत्र ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांचा येलो अलर्ट आहे. नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये आणि मध्य प्रदेशातील घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. संध्याकाळ/रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कमाल आणि किमान तापमान 29 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.