जाहिरात

राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

Raj Thackeray : 2008 मध्ये उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.

राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

सुनील कांबळे, लातूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात लातूरच्या निलंगा न्यायालयाकडून अटक वारंट जारी करण्यात आले आहे. 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी केलं आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून एसटी महामंडळाची बसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरे यांना 20 सप्टेंबर रोजी निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. 

(नक्की वाचा -  IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)

काय आहे प्रकरण?

2008 मध्ये उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. 

(नक्की वाचा -...तर आम्हाला मुद्दा हाती घ्यावा लागेल', शिवरायांच्या पुतळ्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर जरांगे स्पष्टच बोलले)

मात्र तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात चार जणांना रितसर वकिलामार्फत जामीन मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले आहे. पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळूंके यांना हजर करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
खेळता खेळता लागला गळफास, सांगलीत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?
malegaon-gown-gang-terrorizes-residents
Next Article
मालेगावात गाऊन गँगचा धुमाकूळ! चोरीसाठी नवा फंडा, नागरिकांमध्ये भीती