Mumbai- Goa Highway वर वाहतूक कोंडी कायम, CNG गॅस भरलेला टँकर बंद पडल्याने मोठा अडथळा

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम आहे.. इंदापूर आणि माणगाव दरम्यान CNG गॅसने भरलेला टँकर बंद पडल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विघवली गावाजवळील क्रॉसिंग परिसरात टँकर खचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून त्यामुळे वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Traffic congestion persists on the Mumbai-Goa Highway; a major obstruction caused by a breakdown of a CNG tanker.

संबंधित व्हिडीओ