Chandrapur| वसतिगृहातील जेवणावरून विद्यार्थ्यांचा संताप; जेवणात झुरळ,उंदराची विष्ठा सापडल्याचा आरोप

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. वसतिगृहातील भोजनाच्या निकृष्ट दर्जाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून मागील २४ तासांपासून अनेक विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत जेवणामध्ये झुरळ, नाश्त्यात मेलेल्या अळ्या, वरणात किडे आढळले होते. मात्र आता जेवणात उंदराची विष्ठा आणि मेलेल्या उंदराचे अवशेष आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

संबंधित व्हिडीओ