छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे एक अत्यंत प्रेरणादायी देखावा साकारण्यात आलाय.. या देखाव्याच्या माध्यमातून 'वंदे मातरम्' गीताची निर्मिती कशी झाली, बंकिमचंद्रांचे तत्कालीन विचार आणि पुढे जाऊन हे गीत स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य सूत्र कसे बनले, याचा संपूर्ण इतिहास जिवंत करण्यात आला आहे.. सिल्लोड येथील अनिल कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराने हा ऐतिहासिक घटनेचा पट अत्यंत बारकाईने मांडला आहे..