Ganeshotsav 2026| साता समुद्रापार गणपती बाप्पाचा गजर, लंडनमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा निनाद

लंडनमधील सटन मित्र मंडळाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे.यंदा 19 आणि 20 सप्टेंबर रोजी झालेल्या या उत्सवात अडीचशेपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली, तर जवळपास 10 हजार गणेशभक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले.परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. मराठी भाषिक पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि वेशभूषा करून सहभागी झाले.. मात्र, लंडनमधील एकूणच भारतीय समुदायाला एकत्र आणत भक्ती, सेवा आणि सांस्कृतिक एकोप्याचा संदेश देणारा हा गणेशोत्सव विशेष आकर्षण ठरत आहे..

संबंधित व्हिडीओ