अशोक खरात प्रकरण आता धक्कादायत वळणावर आलंय. खरातच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये शिवनिका संस्थानचे पदाधिकारी देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यापैकीच एक प्रमुख पदाधिकारी जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालाय. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना त्यांच्या कारला एका कंटेनरने धडक दिली. अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा मृत्यू झाला.. जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. आणि अशोक खरातच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जायचे. दरम्यान जितेंद्र शेळके यांचा अपघातस्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी.