भाजप नेते नितेश राणे आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. नितेश राणे यांनी एमआयएम ही दहशतवादी संघटना आहे असं म्हटलं होतं यालाच उत्तर देताना तुमच्यात हिमंत असेल तर आधी लोकसभेत असदुद्दीन ओवैसी आहेत त्यांना काढून दाखवा असं प्रत्युत्तर इम्तियाज जलील यांनी दिलंय. तर 'कैसे हराया' बोलणारी सहर शेख नॉट रिचेबल असल्याचं नितेश राणे म्हणालेत, तर याला देखील जलील यांनी उत्तर दिलंय