उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी अहिल्यानगरचे नागरिक बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील शिवाजीनगर भागातील कारखान्यांमध्ये विविध आकर्षक रूपांतील गणेशमूर्ती खरेदीसाठी नगरकरांची गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा लहान मुलांची आवड केंद्रबिंदू ठेवून तयार केलेल्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. बाप्पाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण आहे. आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी.