राज्यातील सिंचन घोटाळ्याबाबत जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंनी गंभीर आरोप केलेत.अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला. असं पांढरेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे निष्पक्ष चौकशी झाल्यास 12 मंत्री तुरुंगात जातील असा दावा संजय राऊतांनी केलाय.