देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यात ही स्पर्धा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे. भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे..सध्याच्या परिस्थिती लोकसभेत 542 खासदार आहेत. तर राज्यसभेत 239 खासदार आहेत. त्यापैकी बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरसचे खासदार मतदानात भाग घेणार नाहीत. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या 770 वर आली असून 386 मतं जिंकणाऱ्याला उमेदवाराचा विजय निश्चित आहे. विद्यमान परिस्थिती सत्ताधारी एनडीए 427 खासदार आहेत. तर INDIA आघाडीकडे 315 मतं आहेत. पण हे मतदान गुप्त मतदान पद्धतीनं होतं. त्यामुळे पक्षादेशाच्या पलिकडे जाऊन मतदान होण्याची शक्यता असते. गेल्यावेळी NDA 527 मतं मिळाली होती. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान केलंय..