मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने नमतं घेतलं. जरांगेंना अपेक्षित असलेला जीआर काढला आणि मराठा वादळ परतवलं. पण हा लढा इथेच संपलेला नाही. कारण ओबीसी समाजाने कायदेशीर लढाईचं हत्यार उपसलंय. त्याआधी भुजबळांनी सरकारला जीआर मागे घेण्याची संधी दिलीय.. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची पहिली ठिणगी पाहुयात या रिपोर्टमधून..